दसरा यंदा साधेपणाने

1 week ago 2
ARTICLE AD
धुळे : टुडे पान १ साठी.. -- दुष्काळामुळे दोंडाईचाचा शाही दसरा यंदा साधेपणाने -- रावल संस्थानचा संवेदनशील निर्णय सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे भान राखत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींशी बांधिलकी जपत दोंडाईचा येथील ऐतिहासिक रावल संस्थानचा यंदाचा शाही विजयादशमी सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रावल संस्थानच्यावतीने परंपरेला जपत हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला. विजयादशमी हा रावल संस्थानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव आहे. दरवर्षी संस्थानतर्फे पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन, अश्वपूजन, भव्य मिरवणूक, सिमोल्लंघन आणि रावण दहन आदी कार्यक्रम पार पडतात. या सोहळ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मात्र यंदा राज्यभरात आणि ग्रामीण भागात दुष्काळामुळे शेतकरी विविध संकटांना सामोरा जात आहे. सण-उत्सव साजरे करताना समाजातील घटकांच्या स्थितीची जाणीव ठेवणे, संकटाच्या काळात बांधवांच्या पाठीशी उभे राहणे आणि सामाजिक भान जपणे ही आपली संस्कृती आहे. या भावनेतून संस्थानच्या परंपरेचा सन्मान राखत यंदा केवळ धार्मिक विधी पूर्ण करून उत्सव साधेपणाने साजरा केला जाईल, असे रावल संस्थानने सांगितले.
Read Entire Article