दहिवेलला खून, गुन्हा

2 days ago 2
ARTICLE AD
पशुवैद्यकीय इमारतीत महिलेचा मृतदेह --- दहिवेलची घटना ः साक्री पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ ः दहिवेल (ता. साक्री) येथे एका अनोळखी महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील जुन्या पशुवैद्यकीय इमारतीत २७ ऑक्टोबरला सायंकाळी महिलेचा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिवेल येथील जुन्या पशुवैद्यकीय इमारतीमधील पडक्या खोलीत २७ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास अनिता नामक महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. रमेश नामक संशयिताने मृत महिलेला काळ्या रंगाच्या कडप्याने उजव्या मांडीवर, कपाळावर आणि डाव्या पायाच्या पंजावर अमानुष मारहाण केली. या गंभीर दुखापतींमुळेच महिलेचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप सातपुते यांनी या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, तिचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न झालेला नाही, तसेच मारेकऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ताही अद्याप समजू शकलेला नाही. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक ओंकार गवळी, साक्री पोलिस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली. उपअधीक्षक गवळी तपास करीत असून, मृत महिलेची ओळख पटविणे आणि मारेकऱ्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
Read Entire Article