दानिश शेखच्या जामीनावर आज सुनावणी

4 days ago 3
ARTICLE AD
पान-१ ------------- ३६-२ दानिशच्या जामीनावर आज सुनावणी होणार ------------- टीसीएस अत्याचार प्रकरण : निदा खान गैरहजर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२६ : बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतरांचा प्रयत्न प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या (ता. २७) होणार आहे. या खटल्यासाठीचे विशेष न्यायाधीश खारकर हे अनुपस्थित असल्याने सोमवारी (ता.२६) सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान या खटल्यातील संशयित निदा खान आजच्या सुनावणीवेळी गैरहजर होती. यासाठी निदाचे वकील प्रतिक ताजनपुरे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली होती. देवळाली कॅम्प पोलिसात टीसीएसमधील लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावण्यासह ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. यावरील सुनावणी आज होती. संशयित तौसिफ बिलाल अत्तर व  संभाजीनगरामधील  एमआयएम नगरसेवक मतीन माजिद पटेल हे न्यायालयात उपस्थित होते. या गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने प्रत्यक्ष वा व्हिसीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले नव्हते. बचाव पक्षातर्फे ॲड. रणजित जाधव, ॲड. उमेश वालझाडे, ॲड. प्रतिक ताजनपुरे उपस्थित होते. न्या. खारकर हे रजेवर असल्याने दानिश शेखच्या जामिनावरील सुनावणी उद्या (ता. २७) होणार आहे.
Read Entire Article