दिवाळीचा फराळ पोहचवा जगभर!

11 hours ago 3
ARTICLE AD
दिवाळीचा फराळ पोहचविण्यासाठी डाक विभागाची आंतरराष्ट्रीय सेवा नंदुरबार, ता. ३० : धुळे- नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकांनी परदेशातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाक अधीक्षक संजय ताठे यांनी केले आहे. दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांना दिवाळी फराळ तसेच इतर अनुज्ञेय वस्तू पाठविण्यासाठी डाक विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा धुळे विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ५६ डाक कार्यालये व ४५३ शाखा डाक कार्यालयांचा धुळे विभागात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी विमा सुविधादेखील उपलब्ध आहे. पार्सल सुरक्षितरीत्या पाठविण्यासाठी डाक कार्यालयात पॅकेजिंग सुविधा उपलब्ध आहे. ट्रॅक ॲन्ड ट्रेस सुविधा पाठविलेल्या पार्सलची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रॅक ॲन्ड ट्रेस सुविधा उपलब्ध आहे. बुकिंगपूर्वी संबंधित डाक कार्यालयाकडून अनुज्ञेय वस्तू, आवश्यक कागदपत्रे, वजन, शुल्क व इतर नियमांबाबत माहिती घ्यावी. दिवाळीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पार्सलची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पार्सल शक्यतो आगाऊ बुक करावे. लागू शुल्क हे गंतव्य देश, बजन व पार्सलच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात येईल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी परदेशातील आपले कुटुंबीय, नातेवाईक व प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे केले आहे.
Read Entire Article