दिवाळीत रेल्वे, विमानसेवा ‘हाऊसफुल्ल’

6 days ago 3
ARTICLE AD
मेन फिचर --- (रेल्वे, विमान सेवेचे संग्रहित छायाचित्र वापरावे) ----------- दिवाळीत रेल्वे, विमानसेवा ‘फुल्ल’ गोव्याला पर्यटकांची पसंती; पुणे, हैदराबादच्या विमानांचे आरक्षणही पूर्ण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासह पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या जळगावकरांची लगबग वाढली आहे. परिणामी, मुंबई आणि पुण्याहून जळगावला येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या पुणे, हैदराबाद आणि गोवा या विमानसेवांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीपूर्वी आणि सुट्यांनंतरच्या काही दिवसांचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांना उपलब्ध तिकिटांसाठी नियोजन करावे लागत आहे. वाढत्या मागणीमुळे काही मार्गांवरील विमान तिकिटांचे दरही वाढले आहेत. विमान प्रवासाला पसंती जळगाव विमानतळावरून गेल्या दोन वर्षांत सुरू झालेल्या विमानसेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे, हैदराबाद आणि गोवा या तिन्ही मार्गांवर तिकिटांची मागणी वाढली आहे. पुणे-जळगाव मार्गावर ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान आरक्षण फुल्ल झाले आहे. तर जळगावहून पुण्याला जाण्यासाठी १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान तिकिटांचे दर पाच ते सात हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हैदराबाद मार्गावरही नोव्हेंबरमधील काही दिवसांच्या तिकिटांचे दर वाढले असून, २ आणि ११ नोव्हेंबरच्या प्रवासासाठी आरक्षण उपलब्ध नसल्याचे तिकीट संकेतस्थळांवरील माहितीतून दिसते. गोव्याच्या पर्यटनाला पसंती दिवाळीच्या सुट्यांमध्ये गोव्याला जाण्यासाठी जळगावकरांकडून विशेष पसंती दिली जात आहे. जळगाव-गोवा विमानसेवेसाठी १ ते १७ नोव्हेंबरदरम्यान तिकिटांची मागणी वाढली आहे. साधारण तीन ते साडेतीन हजार रुपये असलेले तिकीट आता पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. २ नोव्हेंबरला गोव्याहून जळगावला येणाऱ्या विमानातील सर्व तिकिटांची विक्री झाली असून, १२ नोव्हेंबरच्या जळगाव-गोवा विमानाचेही आरक्षण पूर्ण झाले आहे.रेल्वे आणि विमानसेवांमधील वाढती मागणी पाहता, दिवाळीच्या सुट्यांसाठी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक ठरत आहे. चौकट विमान तिकिटांच्या दरात वाढ गेल्या दोन वर्षांत जळगाव विमानतळावरून सुरू झालेल्या पुणे, हैदराबाद आणि गोवा या विमानसेवांनी जळगावकरांना प्रवासाचे नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. दिवाळीच्या काळात या तिन्ही मार्गांवर आरक्षणाची मागणी वाढली असून, तिकिट दरांतही वाढ झाली आहे. असे असताना काही दिवसांची तिकिटे संपली आहेत. चौकट रेल्वेचे आरक्षित तिकिटाला प्रतिक्षा यादी मुंबई तसेच पुणे मार्गावरून येणाऱ्या नियमित रेल्वेगाड्या तसेच दिवाळी स्पेशल गाड्या मध्य रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहेत. परंतु नियमित गाड्यांसोबतच तसेच दिवाळी स्पेशल गाड्यांच्या तिकिटांची आरक्षण फुल झाले असल्याचे रेल्वेच्या तिकीट आरक्षण यादीत दिसून येत आहे.
Read Entire Article