देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती

5 days ago 2
ARTICLE AD
फोटो : H33498 धार्मिक उपक्रमांनी कोजागरी पौर्णिमा उत्साहात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : शहरात कोजागरी पौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवी मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावली. रात्रीच्या वेळी दूध प्राशन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळण्यात आली. कोजागरी पौर्णिमेला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजन, धार्मिक विधी आणि नामस्मरण करण्यात आले. काही ठिकाणी भजन, कीर्तन तसेच सामूहिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवी मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरू होती. मंदिरांमध्ये देवीची पूजाअर्चा करून भाविकांनी दर्शन घेतले. कुटुंबीयांसह मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांची उपस्थितीही जाणवत होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध प्राशन करण्याची परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते. त्यानुसार रात्रीच्या वेळी दूध आटवून त्यात साखर, वेलची, केशर आदी पदार्थ मिसळून ते चंद्रप्रकाशात ठेवण्याची प्रथा अनेकांनी पाळली. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासमवेत एकत्र येत कोजागरीचा आनंद लुटण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक प्रथा आणि कौटुंबिक स्नेह यांचा संगम असलेल्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते.
Read Entire Article