द्वारका ते दत्त मंदिर चौक सहा पदरीकरण

1 day ago 2
ARTICLE AD
टूडे साठी ------------- द्वारका ते दत्त मंदिर चौक सहापदरीकरण रस्त्याचा ताबा प्रमाणपत्राची केंद्राकडून मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक या राष्ट्रीय महामार्ग ६० च्या ५.६५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २२१.५२ कोटी रुपयांची मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ४५ मीटर रुंदीचा अडथळामुक्त रस्ता ९० टक्के लांबीपर्यंत उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र महापालिका आयुक्तांनी द्यावे, अशी मागणी केंद्राने केली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. द्वारका ते दत्त मंदिर या ५.६५ किलोमीटर रस्त्याची सध्याची रुंदी २४ ते ३० मीटर असून ती ४५ मीटर करून सहा पदरी रस्ता व दोन्ही बाजूंना दोन पदरी सेवा रस्ते बांधले जाणार आहेत. हे काम ईपीसी पद्धतीने महापालिकेमार्फत राबवले जाणार आहे. या कामासाठी १७७.७४ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. वित्तीय बोली उघडण्यात आल्या असून मे. व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी सर्वात कमी बोलीधारक ठरली आहे. --------------- कुंभमेळ्यापूर्वी विस्तारीकरण महापालिकेने यापूर्वी मंजूर विकास आराखड्यानुसार ४५ मीटर रुंदीचा रस्ता विनामोबदला उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. अतिरिक्त १५ ते २० मीटरसाठी टीडीआर देण्यात आला आहे. मात्र, निविदा मागवण्यापूर्वीच भूसंपादनाच्या सर्व मंजुऱ्या आणि ९० टक्के रस्त्याचा ताबा असणे बंधनकारक आहे. कुंभमेळ्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हे प्रमाणपत्र तातडीने देणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Read Entire Article