धुळे पं.स.दुष्काळ आढावा बैठक

3 days ago 2
ARTICLE AD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 13562 धुळे : पंचायत समितीत पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीस उपस्थित राम भदाणे. शेजारी रोहन कुवर, अरूण शेवाळे, बापू खलाणे आदी. - पाणीटंचाईची झळ बसू देणार नाही - राम भदाणे : धुळे पंचायत समितीत कृती आराखडा बैठक सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २७ : दुष्काळी स्थितीत धुळे तालुक्यात एकही गाव तहानलेले राहणार नाही. एकाही नागरिकाला किंवा जनावराला पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी प्रशासनाने अधिक सजग राहून तातडीने कार्यवाही करावी. तसेच, वीजेअभावी ग्रामीण भागातील पाणीयोजना कोलमडणार नाहीत, याची दक्षता घेत महावितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश आमदार राम भदाणे यांनी दिले. धुळे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तालुका पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सावरे, उपअभियंता प्रताप पाटील, महावितरण कंपनीचे अधिकारी जोशी व अन्य अधिकारी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. - गावानुसार नियोजन करा आमदार भदाणे यांनी प्रशासनाला पाणीटंचाईच्या मुकाबल्यासाठी आठ कलमी कृती आराखडा आखून दिला. तालुक्यातील प्रत्येक गावातील उपलब्ध विहिरी, कूपनलिका आणि सध्याच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन गावानुसार स्वतंत्र टंचाई निवारण आराखडा तात्काळ राबवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कूपनलिका व खासगी विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत श्री. कुवर, श्री. शेवाळे, श्री. खलाणे, श्री. चौधरी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. - १४-१ ...चौकट.... १४-१ प्रशासनाला आठ कलमी निर्देश आमदारांनी प्रशासनाला दिलेले आठ कलमी निर्देश असे : प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी नियोजन आराखडा तयार करून तो तात्काळ राबवावा, टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तात्पुरत्या स्वरूपाच्या नळ योजना त्वरित सुरू कराव्यात, पाणीपुरवठ्यासाठी खासगी विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, वीजेअभावी एकही पाणीयोजना बंद पडणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणने घ्यावी, जलवाहिनीतील पाण्याची गळती तातडीने शोधून ती दुरुस्त करावी, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.
Read Entire Article