ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला वेग

1 week ago 2
ARTICLE AD
ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला वेग सिंहस्थाची तयारी : विकासकामांचा प्राधान्यक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२१ : सिंहस्थ कुंभमेळा पर्वास ३१ ला ध्वजारोहण सोहळ्याने प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ परिसरातील तयारीला वेग आला आहे. ध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वाचे काऊंटडाऊन सुरु होणार असल्याने नाशिक व त्र्यंबकेश्‍वरसह जिल्ह्यातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार ती वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ३१ रोजी शुभारंभ होत असून यंदाचे पर्व २२ महिने चालणार आहे. त्यामुळे देशभरातून १२ कोटी भाविक तसेच १० लाखांच्या आसपास साधु-महंत नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महामार्ग, नाशिक परिक्रमा मार्ग, नाशिक व त्र्यंबकेश्‍वर शहरांतर्गत रस्ते, पर्यटनस्थळे, रेल्वे तसेच महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. हे सर्व प्रकल्प मार्च-२०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट सिंहस्थ प्राधिकरण व यंत्रणांना ठेवले आहे. मात्र भू-संपादन, स्थानिक प्रश्‍न, तांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय मान्यतांमुळे काही कामांमध्ये विलंब होत आहे. तरीदेखील या अडचणी तातडीने सोडवून त्या मार्गी लावण्यासाठी यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. रामकाल व दर्शनपथाला गती नाशिकमधील रामकाल पथ तसेच त्र्यंबकेश्‍वरमध्ये दर्शन पथ साकारण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पावेळी अगोदर स्थानिकांची पुनर्वसन आणि जागेवरील छोट्या-मोठ्या समस्यांना प्रशासनाला तोंड द्यावे लागले. परंतु, प्रशासनाने संवादातून मार्ग काढत या दोन्ही प्रकल्पांना गती दिली आहे. मार्च ते मे २०२७ पर्यत हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. नदीघाटांचे काम ६० टक्के सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अंदाजे साडेसात किलोमीटर तसेच त्र्यंबकेश्‍वरमध्ये साधारणतः दीड किलोमीटरचे नदीघाट नव्याने साकारण्यात येत आहे. या घाटांसाठीचा भू-संपादनाचा विषय मार्गी लागला असून जवळपास ६० टक्के कामे पूर्णत्वास आली आहे. दरम्यान, रिंगरोडसंदर्भातही प्रशासनाने जवळपास मार्ग काढला आहे. दरम्यान, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोडसह पाच रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे.
Read Entire Article