नव्‍यांसोबत जुन्‍या कायद्याचा अभ्यास गरजेचा

1 week ago 2
ARTICLE AD
छायाचित्र H33361 नव्‍यांसोबत जुन्‍या कायद्याचा अभ्यास गरजेचा ॲड. जे. बी. भिडे स्‍मृती व्‍याख्यानमालेत तज्‍ज्ञांचा विधीच्‍या विद्यार्थ्यांना सल्‍ला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : सध्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांना भारतीय दंड संहिता अधिनियमाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. परंतु हे सुधारित कायदे लागू होण्यापूर्वी दाखल खटले भारतीय न्‍याय संहितेनुसार चालणार आहे. पुढील काही वर्षे हे खटले चालतील. त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी नव्‍या कायद्यांसोबत जुन्‍यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तज्‍ज्ञांनी शुक्रवारी (ता.२३) केले. नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित ‘विधी व्याख्यानमाला’ कार्यक्रम जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील सभागृहात झाला. या व्याख्यानमालेत ॲड. जे. बी. भिडे यांच्या स्मरणार्थ ‘जुना व नवा फौजदारी कायदा तुलनात्मक विचार’ या विषयावर तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते. ॲड. अविनाश भिडे म्‍हणाले, की त्‍या-त्‍या काळातील सामाजिक परिस्‍थिती लक्षात घेत कायद्यांमध्ये दुरुस्‍ती होत आली आहे. सद्यःस्‍थितीत नागरिकांचे आचार-विचार, कामाच्‍या पद्धती बदलल्‍या आहेत. त्‍यामुळे काळाची निकड लक्षात घेता, कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कलमांमध्ये बदल झालेला असला तरी मुळ गाभा बदललेला नाही. ॲड. गजानन चव्हाण यांनी सद्यःस्‍थितीत दाखल खटल्‍यांच्‍या फेरयाचिकेतील तांत्रिक बाबी, पंचनाम्‍यांचे चित्रीकरण, पोलिसांना कोठडी मागण्यासाठीच्‍या नियमावलीतील सुधारणा आदी तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. तर ॲड. सुशिल अत्रे यांनी भारतीय साक्ष अधिनियमासंदर्भात मार्गदर्शन केले.
Read Entire Article