नाशिककरांनो, ध्वजारोहण, गोदाआरतीला असे जाता येणार...

10 hours ago 3
ARTICLE AD
असे जाता येणार ध्वजारोहण, गोदाआरतीला -------------- विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन .... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३० : रामतीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३१) दुपारी होत आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी गोदाघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जवळपास सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. नागरिकांना ध्वजारोहण व गोदाआरतीसाठी जाण्यासाठी काही मार्गांनी पायी जाता येणार आहे. ध्वजारोहण आणि गोदाआरती या दोन कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठीच्या पायी मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बंद रस्त्यांची आणि ध्वजारोहण, गोदा आरतीसाठी पायी जाण्याच्या मार्गांची माहिती घ्यावी, त्याच मार्गाने जावे. यातील काही मार्ग हे गोदाआरती करण्यासाठी येणाऱ्यांसाठी असल्याने त्याच मार्गाने नागरिकांना जाता येणार नाही. ............. २०-२ ध्वजारोहण सोहळ्यासाठी जाण्याचा मार्ग ---------------- गांधी तलाव, यशवंत महाराज पटांगणाकडे (पायी) १) गंगापूर रोड - गुरांचा दवाखाना - सिद्धेश्वर मंदिर - संभाजी महाराज गार्डन, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त मंदिर घाट - गांधी तलाव २) अशोकस्तंभ - बाजार - सरकारवाडा पोलिस चौकी - भांडी बाजार - बालाजी मंदिर - निळकंठेश्वर घाट - गांधी तलाव ३) रेडक्रॉस सिग्नल - धुमाळ टी पॉइंट - नेहरू चौक - दिल्ली दरवाजा - रोकडोबा मैदान ४) बी.डी. भालेकर मैदान येथे वाहने पार्क करून पायी - रेडक्रॉस सिग्नल - धुमाळ टी पॉईट - नेहरू चौक - दिल्ली दरवाजा - रोकडोबा मैदान -------- जुने भाजी पटांगण, म्हसोबा पटांगणाकडे (पायी) १) तपोवन क्रॉसिंग - गौरी पटांगण - म्हसोबा पटांगण - जुने भाजी पटांगण २) मुंबई-आग्रा महामार्गने - ट्रॅक्टर हाऊस - नानावली पोलिस चौकी - अमरधाम पुल क्रॉस करून शिंदे मळा येथे वाहने पार्क करून पायी गौरी पटांगण, जुने भाजी पटांगण ३) गणेशवाडी देवी चौक - फुल बाजार - गौरी पटांगण येथे वाहने पार्क करून पायी जुने भाजी पटांगण ----- २०-२ ध्वजारोहण, गोदाआरतीदरम्यान बंद मार्ग १) रविवार कारंजा - होळकर पुल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - दिंडोरी नाका २) मखमलाबाद नाका - मालेगाव स्टॅण्ड - रामतीर्थ - सरदार चौक ३) रामतीर्थ - मालविय चौक - पंचवटी कारंजा ४) शनी चौक - रामतीर्थ ५) गाडगे महाराज पुल ६. रामसेतू पुल -----------------
Read Entire Article