नेव्हरे धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू शोधमोहिमेदरम्यान पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह

1 week ago 3
ARTICLE AD
नेव्हरे धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू --- पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह; शिरसोली परिसरात हळहळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : शेताकडे गेलेले शेतकरी कैलास हरी चव्हाण- मराठे (वय ५५, रा. शिरसोली प्र. न.) यांचा नेव्हरे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २२) शेताकडे गेलेले चव्हाण घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी (ता. २३) दुपारी धरणातील पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. कैलास चव्हाण यांची शिरसोली-नेव्हरे शिवारात शेती आहे. गुरुवारी दुपारी ते गावातून शेताकडे गेले होते. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या नेव्हरे धरणाच्या काठावर त्यांचा रुमाल आढळून आला. त्यामुळे ते धरणात उतरले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी पुन्हा धरण परिसरात शोध सुरू असताना, दुपारी पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. हा मृतदेह कैलास चव्हाण यांचा असल्याची खात्री झाली. याबाबत पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांना माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कैलास चव्हाण यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Read Entire Article