बढतीनंतर अधिकाऱ्यांची पुन्हा मालेगावलाच पसंती!

1 day ago 3
ARTICLE AD
फोटो -16183 मालेगाव : आयुक्त रवींद्र जाधवचे निवासस्थान. =====---- बढतीनंतर अधिकाऱ्यांची पुन्हा मालेगावलाच पसंती! ------------------------------------------- मालेगावात संताप; आयुक्तपदी आयएएस अधिकाऱ्याची मागणी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २९ : निवृत्तीला अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना येथील महापालिका आयुक्त रवींद्र जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याचा स्वीय सहायक नीलेश पाटील व अकाउंटंट हरीश डिंबर यांनाही पथकाने अटक केल्याने भ्रष्टाचाराची साखळी किती खोलवर रुजली असल्याचे व मालेगाव जणू भ्रष्टाचाराचे कुरणच झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे सामाजिक संघटनांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, महापालिकेत ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून द्यावा, अशी जाेरदार मागणी होत आहे. अधिकाऱ्यांची मालेगावला पसंती शहरात यापूर्वी महसूल, पोलिस व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारीही या सापळ्यात अडकले आहेत. शहर विकासाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करून घेण्याबरोबरच स्वतःचे चांगभले करून घेतात. येथे एकदा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बदलीवर गेलेला अधिकारी बढतीनंतर पुन्हा मालेगावलाच पसंती देतो. याची अनेक उदाहरणे महसूल विभागातील देता येतील. अधिकाऱ्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे. अधिकारीच भ्रष्ट असतील तर इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे राहणार, असा प्रश्‍न येथे उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांत दुसरा स्वीय सहायक जाळ्यात आयुक्त रवींद्र जाधव १३ डिसेंबर २०२३ ला महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाला. जवळपास अडीच वर्षे त्याच्याकडे आयुक्तांबरोबरच प्रशासकाचा कार्यभार होता. ३२ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत आयुक्त जाधव याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसऱ्यांदा कारवाई केली. यापूर्वी धुळे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना कारवाई करण्यात आली होती. ऑक्टोबरअखेर सेवाकाळ संपणार होता. गेल्या काही दिवसांपासून तो महापालिकेतही फिरकला नव्हता. रावळगाव नाका भागातील निवासस्थानातूनच कामकाज चालायचे. अनेकदा तो निवासस्थानाबाहेरच राहायचा, त्यामुळे अलीकडे फारसे कोणाला भेटत नव्हता. गेल्या आठवड्यापासून महापालिकेत कारवाईबाबत चर्चा होत होती. गेल्या काही दिवसांतील ठराविक कर्मचाऱ्यांची पदोन्नती व इतर बाबींबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आयुक्त जाधव याच्या येथील कार्यकाळात तीन वर्षांत दोन स्वीय सहायक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. स्वीय सहायक नीलेश पाटील याच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी होती, तर हरीश डिंबर लेखापाल आहे. तिघांच्या घरांची झाडाझडती आयुक्त जाधव, स्वीय सहायक पाटील व लेखापाल डिंबर यांना अटक झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी तिघांच्या घरांची झाडाझडती सुरू केली आहे. तिन्ही ठिकाणी तीन वेगवेगळे पथक शोध घेत होते. तपासात काय हाती लागले, हे मात्र कळू शकले नाही. काळ्या रंगाची एक बॅग मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात नेमके काय आहे, हे समजले नाही.
Read Entire Article