बेटावद बालाजी रथ आज मस्ट

1 week ago 3
ARTICLE AD
फोटो क्रमांक : 33243 बेटावद (ता. शिंदखेडा) : श्री मोठा बालाजी संस्थानतर्फे बुधवारी काढण्यात आलेला रथ ओढताना भाविक व ग्रामस्थ. ---- बेटावदला मोठा बालाजी रथोत्सव साजरा -- विधिवत पूजेनंतर भक्तिमय वातावरणात रथाची मिरवणूक सकाळ वृत्तसेवा बेटावद, ता. २१ : येथील श्री मोठा बालाजी संस्थानतर्फे बुधवारी (ता. २१) दुपारी श्री मोठा बालाजींच्या मूर्तीची व रथाची विधिवत पूजा करण्यात आली. पूजेनंतर वाद्यांच्या गजरात रथ मिरवणुकीस सुरुवात झाली. या सोहळ्यामुळे बेटावद परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रथाच्या विधिवत पूजेनंतर रथाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. रथ मिरवणुकीत बेटावदसह परिसरातील गावातील भाविक सहभागी झाले होते. रथ मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी श्रुती कारंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास पाटील, पंकज कदम, नथा वारुडे, शिंदखेड्याचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, महेश पाटील, मोतीलाल वाकडे, बेटावदचे माजी सरपंच मंगलचंद जैन, अरुण देशमुख उपस्थित होते. श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष प्रकाश माळी, योगेश माळी, हरीश माळी, पुजारी अनंत झारे, मिलिंद पाठक, पंचभाई, रथाचे मानकरी अनिल पाटील, संतोष कोळी, बापू धोबी या मानकऱ्यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Read Entire Article