भवानी महालक्ष्मी मंदिरात अष्टमी यज्ञ उत्साहात

1 week ago 2
ARTICLE AD
NSK26H33053 जळगाव : सराफ बाजारातील भवानी महालक्ष्मी मंदिरात सोमवारी अष्टमी यज्ञ पार पडला, त्यात सहभागी भाविक. -------- भवानी महालक्ष्मी मंदिरात अष्टमी यज्ञ उत्साहात उपशीर्षक हजारो भाविकांनी घेतले दर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : येथील सराफ बाजारातील पुरातन भवानी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक अष्टमी यज्ञ उत्साहात झाला. या धार्मिक सोहळ्याला दुपारपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यंदाच्या अष्टमी यज्ञाचे मुख्य यजमानपद प्रशांत अग्रवाल आणि विश्वनाथ अग्रवाल परिवाराने भूषवले. यज्ञाचे मुख्य आचार्य म्हणून पंडित महेशमहाराज त्रिपाठी यांनी, तर ग्राम पुरोहित महेंद्र जोशी यांनी आचार्य म्हणून पौरोहित्य केले. दुपारी चारला या विधीवत यज्ञाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री आठला महाआरतीने यज्ञाची सांगता झाली. सराफ बाजारातील या पुरातन भवानी मातेच्या अष्टमी यज्ञाचे दर्शन घेण्यासाठी आणि यज्ञात श्रीफळ (नारळ) अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किसनलाल पुरोहित आणि यज्ञ समितीचे राजू बांगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली. ----------
Read Entire Article