भुसावळ रेल्वे स्थानकावरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

2 days ago 2
ARTICLE AD
भुसावळ रेल्वे स्थानकावरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २८ : येथील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास घडली. संबंधित मुलगी आणि तिची लहान बहीण नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाल्या. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मोठी बहीण लहान बहिणीला घेऊन भुसावळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर गेली. तेथे उभ्या असलेल्या सुरत पॅसेंजरमध्ये लहान बहिणीला बसवून ‘मी पाच मिनिटांत येते,’ असे सांगून ती निघून गेली. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. दरम्यान, रेल्वे सुरू झाल्याने लहान बहिणीला गाडीतून उतरता आले नाही. धरणगाव रेल्वेस्थानकावर गाडी बराच वेळ थांबल्यानंतर ती तेथे उतरली. त्यानंतर तिने नातेवाइकांना भ्रमणध्वीनवरून माहिती दिली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाइकांसह इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. लहान बहिणीने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्थानकावर त्यांच्या परिसरातील संशयित गणेश भालेराव नावाचा तरुण दिसला होता. या माहितीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे. उपनिरीक्षक गफ्फार शेख तपास करीत आहेत.
Read Entire Article