भुसावळात महिलेच्या घरात घुसून सुरीने हल्ला

1 week ago 3
ARTICLE AD
भुसावळात प्राणघातक हल्ला करून महिलेसह दोघे जखमी ----- जीवे मारण्याचीही धमकी; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २२ : तालुक्यातील झेडआरटीसी परिसरातील व्यक्तीने दारूच्या नशेत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री पुन्हा घरात अनधिकृत प्रवेश करून सुरीने हल्ला केला. ही घटना बुधवारी (ता. २१) घडली. या हल्ल्यात महिला व तिला वाचविण्यासाठी धावून आलेले संतोष गणेश नवगिरे जखमी झाले. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतल्याची तक्रार येथील तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. देवेंद्र ऊर्फ डेव्हिड अशोक सरवटकर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास महिलेच्या घरासमोर दारूच्या नशेत आला. त्याने महिलेला पाहून शिवीगाळ केली व निघून गेला. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो पुन्हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे शिरला. त्याने शिवीगाळ करून सुरीने महिलेवर हल्ला केला. त्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली व तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. महिलेला वाचविण्यासाठी धावून आलेल्या तिच्या सासूला संशयिताने ढकलून दिले, तर संतोष नवगिरे यांच्या डाव्या गालावरही सुरीने वार केला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून देवेंद्र ऊर्फ डेव्हिड अशोक सरवटकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Read Entire Article