मनोज थेटे, अध्यक्ष (अखिल भारतीय पुरोहित संघ, त्र्यंबकेश्‍वर)

1 day ago 2
ARTICLE AD
ध्वजारोहण सोहळा विशेष पुरवणी -- त्र्यंबक पुरोहित संघाचा नियोजनात सिंहाचा वाटा … लीड सिंहस्थ कुंभमेळा हा त्रिखंडी योगावर होत असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. साधारणतः ७१ वर्षांनी असा योग जुळून आला. जेव्हा गुरू ग्रह एखाद्या विशिष्ट राशीत आपल्या नियमित मार्गक्रमणादरम्यान तीन वेळा प्रवेश करतो, तेव्हा त्या स्थितीला त्रिखंडी योग म्हणतात. या दुर्मीळ संयोगावर सिंहस्थ पर्वाची सुरुवात होत असल्याने ध्वजारोहण सोहळ्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. - मनोज थेटे, अध्यक्ष, अखिल भारतीय पुरोहित संघ, त्र्यंबकेश्‍वर -- त्र्यं बकेश्‍वर येथील अखिल भारतीय पुरोहित संघांचे कार्य अनादी काळापासून येथे सुरू आहे. मात्र, संस्था म्हणून १९७७ मध्ये नोंदणी करण्यात आली. अनादी काळातील दाखले द्यायचे झाल्यास संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, तेव्हा ३१ डिसेंबरला ते त्र्यंबकेश्‍वरला मुक्कामी होते. त्या वेळी पुरोहित संघाचे सदस्य ढेरगे गुरुजी यांनी त्यांचे पौरोहित्य केल्याची नोंद त्यांच्या बखरीत आजही आहे. सुमारे ३०० वर्षांपासून पुरोहित संघ येथे कार्यरत असल्याचे यातून स्पष्ट होते. पुरोहित संघाची संस्था म्हणून नोंदणी १९७७ मध्ये करण्यात आली. त्यालाही आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पुरोहित संघातर्फे त्र्यंबकेश्‍वरमध्ये विविध धार्मिक विधी केले जातात. पूर्वी त्यांना तीर्थयात्रा म्हटले जायचे. यात गंगापूजन, श्राद्धपूजन, नारायण नागबली, मंदिरातील पूजा, त्रिपिंडी, कालसर्प योग पूजा विधींचा यात समावेश होतो. नारायण नागबली यांसारखे विधी हे फक्त त्र्यंबकेश्‍वरमध्येच होतात. प्रत्येक विधीचे माहात्म्य वेगवेगळे असून, त्यानुसार पूजाविधी करण्याचा पूर्वेतिहास येथे आहे. त्याच्या लिखित स्वरूपातील नोंदीही आढळतात. त्र्यंबकेश्‍वरमधील दहा आखाड्यांचे उपाध्ये हे त्र्यंबकेश्‍वरच्या अखिल भारतीय पुरोहित संघाकडे आहे. -- पुरोहित संघाची भूमिका महत्त्वाची सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार केला तर पर्वणीचे मुहूर्त निश्‍चिती करण्यात पुरोहित संघ व आखाड्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ध्वजारोहण सोहळ्याची तयारी करताना पुरोहित संघ हे पालिका प्रशासन व देवस्थान ट्रस्टला विश्‍वासात घेऊन नियोजन सुरू आहे. या परंपरेची जुनी नोंद आपल्याला या ठिकाणी आढळते. धार्मिक विधींसह सिंहस्थाची तयारी, मुहूर्त व सोहळ्यांचे नियोजन करण्यात येते. शनिवारी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धर्माचे प्रमुख शृंगेरी शारदा पीठाधिश्वर श्री विधुशेखर भारती यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गोदावरी पूजन आणि त्र्यंबकराज मंदिरात पूजाविधी होणार आहे. उपरोक्त दोन्ही व्यक्तींमध्ये एक धर्माची प्रमुख आणि दुसरी राष्ट्राची प्रमुख व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित राहील. -- सोहळा अविस्मरणीय ठरेल ध्वजारोहण सोहळा आमच्यासाठी अलौकिक, अविस्मरणीय आणि आनंददायी ठरेल, असा विश्‍वास आहे. त्याविषयीची भावना शब्दातीत असून, शनिवार या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल. राष्ट्रपती प्रथमच त्र्यंबकेश्‍वरला येत आहेत. यापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये माजी राष्ट्रपती सहभागी झाले. उच्च स्थानावरील व्यक्तींच्या उपस्थितीत होणारा त्रिखंडी योगावरील हा सोहळा त्र्यंबकेश्‍वरवासीयांसह पुरोहित संघ, पालिका, आखाड्यांचे साधू- महंत, भाविकांना परमोच्च आनंद देईल, असा विश्‍वास आहे.
Read Entire Article