मराठा समाज आंदोलन

1 day ago 2
ARTICLE AD
धुळे टुडे १ साठी... --- फोटो- NSK26H33964 धुळे : मंत्री दादा भुसे यांचा पुतळा जाळण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली. --- मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात --- मंत्री भुसें यांचा पुतळा जाळण्याचा होता प्रयत्न सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्याबद्दल मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. २९) धुळ्यात आंदोलन केले. मंत्री भुसे यांनी जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी करत मंत्री भुसे यांचा पुतळा जाळण्यासाठी घेवून जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी पुतळा जाळण्यापूर्वीच ताब्यात घेतले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन श्री. जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची माफी मागावी, असे वक्तव्य मंत्री भुसे यांनी केल्याचा आरोप मराठा समाजाने केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवतीर्थ चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. मंत्री भुसे यांचा पुतळा घेऊन आंदोलक महापालिकेकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, भैया शिंदे, भानुदास चौधरी, विजय चव्हाण, दीपक रौंदळ, अर्जुन पाटील, उल्हास पाटील, शाम रायगुडे, किशोर वाघ, संतोष लकडे, प्रफुल्ल माने, गोविंद वाघ, प्रभाकर वाघ, वामन मोहिते आणि राकेश भोसले यांच्यासह समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले. ---
Read Entire Article