मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची विशेष स्वच्छता

2 weeks ago 3
ARTICLE AD
NSK26H32704 जळगाव : गोलाणी संकुलाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर स्वच्छता करताना महापालिकेचे कर्मचारी. ........... मुख्य बाजारपेठेतून ३२ ट्रॅक्टर कचरा उचलला विशेष मोहीम; कचरा साचणाऱ्या ठिकाणांवर स्वच्छता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : शहरातील मुख्य बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविली. जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने एकूण ३२ ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. यामुळे बाजारपेठेतील अस्वच्छता दूर करण्यासाठी मदत झाली. आयुक्त आदित्य जिवने, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे आणि सहायक अभियंता समीर बोरोले यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. १६) ही मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील कचरा साचणाऱ्या प्रमुख ठिकाणांना प्राधान्य देत स्वच्छतेची कामे करण्यात आली. बांधकाम विभागाच्या ट्रॅक्टरसह जेसीबीचा वापर करून कचरा उचलण्यात आला आणि विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. मुख्य बाजारपेठेतील दायमा शाळा, सुभाष चौक, इस्लामपुरा, फुले मार्केट, बी. जे. मार्केट, आर. आर. शाळा, बळीराम पेठ, गोलाणी मार्केट आणि शाहूनगर रोड या भागांतील कचऱ्याचे ढीग हटविण्यात आले. गर्दीच्या या परिसरात कचरा साचल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रूपेश भालेराव, रमेश कांबळे, प्रभाग मुकादम रवी संकत, विशाल चागरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Read Entire Article