राजमोहन शर्माला बीडमधून अटक

1 day ago 2
ARTICLE AD
३०-२ सेवानिवृत्त वेतन अधीक्षक शर्माला बीडमधून अटक शालार्थ आयडी घोटाळा : शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : बहुचर्चित सुमारे १६० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा याला नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पथकाने बीडमधून बेड्या ठोकल्या आहेत. शर्मा यास न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता.३१) पोलिस कोठडी सुनावली आहे. जळगावमधील ११ शाळांमधील ९५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना आणि शालार्थ प्रस्तावांना कोणतीही वैयक्तिक मान्यता नसताना, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे ही फसवणूक करण्यात आली आहे. या बनावट नोंदींच्या आधारे शासनाची तब्बल १० कोटी ९ लाख ५३ हजार ६४९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षकांसह आतापर्यंत सुमारे १४५ आरोपी निष्पन्न झाले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात शालार्थ आयडी घोटाळयाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (वय ५८) हा संशयित फरार होता. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, हवालदार राहुल जगजाप, संदीप भुरे, राकेश राऊत व गुरु गांगुर्डे यांनी बीडमधील आंबेजोगाई येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. ---------------
Read Entire Article