रिअल इस्टेटचे सीमोल्लंघन

1 week ago 2
ARTICLE AD
पान एक मेन जवळ स्वतंत्र लावणे ------------------ रिअल इस्टेटचे सीमोल्लंघन दसयाच्या मुहूर्तावर सव्वाशे कोटींची उलाढाल नाशिक, ता. २० : नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राने मात्र विजयादशमीचा मुहूर्त साधत दणक्यात सीमोल्लंघन केले आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कमी किमतीच्या घरांना मोठी मागणी दिसून आली. नवरात्रीचे नऊ दिवस आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरात १०० हून अधिक नवीन बुकिंग, ५५ पेक्षा जास्त गृहप्रवेश आणि १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली. बाजाराचा आढावा घेतला असता बांधिव घरांना, विशेषतः वन आणि टू बीएचके फ्लॅटला सर्वाधिक मागणी आहे. ३० ते ३५ लाखांपर्यंतचा टू बीएचके आणि २५ लाखांच्या आत असलेला वन बीएचके ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. इंदिरानगर, पाथर्डी फाटा भागाला मध्यमवर्गीयांची पसंती असून कामगार वर्गाकडून अंबड आणि चुंचाळे शिवारातील कमी किमतीच्या घरांना मागणी वाढली आहे.जेलरोड, नांदूर, मानूर, मखमलाबाद, आडगाव या भागात कमी किमतीतही गेटेड कम्युनिटी प्रकल्प विकसित झाले असून तिथेही बुकिंगचा ओघ वाढलेला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डरांनी विविध ऑफर्स दिल्या आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि कागदपत्र खर्च मोफत, दुचाकी-चारचाकी वाहने, किचन ट्रॉली, फ्रिज, वॉशिंग मशिन अशा भेटवस्तू आणि मोफत कायदेशीर सल्ला दिला जात आहे. अनेक ठिकाणी दसऱ्याला बुकिंग आणि दिवाळीला ताबा, अशी योजना आणली आहे. -------- विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीचे ९ दिवस आणि आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात १०० पेक्षा जास्त नवीन बुकिंग्स, ५५ पेक्षा जास्त गृहप्रवेश, आणि १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ग्राहकांचा हा उदंड प्रतिसाद नाशिकच्या गृहनिर्माण क्षेत्रावरील दृढ विश्वास आणि शहराचा वाढता विकास दर्शवतो. - गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो. ---------------------------
Read Entire Article