वनजमीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तहसीलवर मोर्चा

1 week ago 2
ARTICLE AD
SNR26B23226 सिन्नर ः विविध मागण्यांसाठी माकपतर्फे काढण्यात आलेला मोर्चा. ३०-२ वनहक्क, जमिनींबाबत सिन्नरला माकपचा मोर्चा ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२२ ः तालुक्यात वनजमीन, वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, गायरान तसेच शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांची सातबारा व नमुना आठमध्ये नोंद करावी आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना देण्यात आले. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दुष्काळावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. जमिनीचे हक्क, घरांच्या नोंदी, शेतकऱ्यांचे कर्ज आणि दुष्काळाच्या समस्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. वनक्षेत्रात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या आणि शेती करणाऱ्या पात्र नागरिकांना कायद्यानुसार न्याय मिळावा, वनहक्क कायद्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी व्हावी, पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. वनहक्काशी संबंधित प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे गावित यांनी सांगितले. पात्र नागरिकांच्या घरांची सात वनजमीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तहसीलवर मोर्चाबारा उताऱ्यावर तसेच नमुना आठमध्ये नोंद करण्यात यावी, नोंदीअभावी नागरिकांना मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, शासकीय योजनांचा लाभ आणि इतर प्रशासकीय कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित नियम व कायदेशीर तरतुदींनुसार पात्र प्रकरणांवर निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, कर्जमाफीची घोषणा न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा उपाययोजना राबविण्याची मागणीही केली. ------------
Read Entire Article