Pandharpur Vitthal Mandir : राज्यातील वारकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून तीन दिवस वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार नाही. विठ्ठल रुक्मिणीचे मंदीर तीन दिवस बंद राहणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागाकडून रासायनिक लेपणाची प्रक्रिया या कालावधीत केली जाणार आहे. त्यामुळं दर्शन घेता येणार नाही.

विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज

विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याने भाविकांची चिंता वाढली होती. यातच न्यायालयीन लढाईमध्ये आषाढीपूर्वी करावी लागणारे लेपन प्रक्रिया ही लांबत दिली होती. आता आज रात्री शेजाररतीनंतर भारतीय पुरातत्व विभागाचे तज्ञ मंडळी या प्रक्रियेला सुरुवात करणार असून आज मूर्तीची सफाई केली जाणार आहे. उद्यापासून लेपण प्रक्रियेला सुरुवात होणार असून ज्या ठिकाणी मूर्तीचा भाग झिजला आहे त्या ठिकाणी याच पद्धतीच्या दगडाचा चुरा वापरून मूर्तीच्या झिजलेल्या भागात भरला जाणार आहे. विशेषता विठ्ठल मूर्तीच्या पायाची पूर्णपणे झीज झाल्याने या पायावर मोठे काम भारतीय पुरातत्व विभागाला करावे लागणार आहे. या पद्धतीची झीज भरून काढल्यानंतर मूर्तीवर नैसर्गिक रसायनांच्या माध्यमातून रासायनिक लेपण केले जाणार असून ज्यामुळे मूर्तीचे आयुष्य वाढू शकणार आहे.

दरम्यान, दरवर्षी पंढरपुरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुराया आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्ती सातत्याने झीजत आहे. त्यामुळं मंदिर समितीसह भाविकांची चिंता वाढली होती. त्यातच भारतीय पुरातत्व विभागाकडून होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला काही भाविकांनी विरोध करीत न्यायालयात दाद मागितल्याने याला जवळपास तीन महिने उशीर झाला होता. आता मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या रासायनिक प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविला होता. या नंतर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अशातच आता आज म्हणजे 22 सप्टेंबर रोजी शेजारतीनंतर भारतीय पुरातत्त्व विभाग आपल्या कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली होती.

झीज वाढू नये, तडे भरून निघावेत आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे म्हणून लेपन

विठ्ठला मूर्तीच्या चरणांवर लाखो भाविक वर्षानुवर्षे मस्तक टेकवतात आणि स्पर्श करतात. तसेच अभिषेक, तापमानातील बदल आणि आर्द्रता यामुळे दगडाची झीज होते. ही झीज वाढू नये, तडे भरून निघावेत आणि मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे, यासाठी हे लेपन केले जाते. परंपरेत या लेपनाला 'वज्रलेप' असे म्हटले जाते. मात्र, सध्या पुरातत्त्व विभाग (ASI) ज्या पद्धतीची शिफारस करतो, त्यात मान्यताप्राप्त आधुनिक रासायनिक संरक्षक लेप वापरला जातो. यात प्रामुख्याने इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि पाणी न झिरपणारे सिलिकॉन आधारित पदार्थ वापरले जातात, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायन तज्ज्ञ विलास पुनीराज यांनी दिली.