विजेच्या धक्क्याने खासगी वायरमनचा मृत्यु

2 days ago 3
ARTICLE AD
NSK26H33833 : योगेश वाघ --- विजेच्या धक्क्याने खासगी वायरमनचा मृत्यू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : पिंप्राळा परिसरात घरगुती इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना, विजेचा जोरदार धक्का लागून खासगी वायरमन योगेश उर्फ भय्या वाघ यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंप्राळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत भय्या वाघ शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता म्हणून परिचित होते. जिल्‍हा रुग्णालयात परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वाघ बुधवारी (ता. २८) सकाळीच नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले. पिंप्राळा परिसरात एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना, त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते जागेवरच बेशुद्ध पडले. पिंप्राळ्यातील तरुणांनी त्यांना उचलून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. कुटुंबीयांना मोठा धक्का सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या भय्या वाघ यांच्या मृत्यूची बातमी दुपारी कळताच त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला मोठा मानसिक धक्का बसला आहे. चौकट शिवसैनिकांची रुग्णालयात गर्दी निधनाचे वृत्त कळताच शिवसेना पदाधिकारी गजानन मालपुरे, माजी महानगराध्यक्ष कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक आबा कापसे, यांच्यासह कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी जिल्‍हा रुग्णालयात गर्दी केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
Read Entire Article