शालार्थ आयडी घोटाळा

2 days ago 3
ARTICLE AD
लोगो : शालार्थ आयडी घोटाळा --- शीर्षक वैयक्तिक मान्यतांच्या फाईलींवर आता ‘योग्य-अयोग्य’चा शेरा मान्यता रद्दचे आणखी ९८ आदेश शिक्षण विभागाला प्राप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याच्या ‘एसआयटी’ चौकशीत वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांच्या फायली मागविल्या आहेत. त्यानुसार, माध्यमिक शिक्षण विभागाकडून फायलींची तपासणी करून त्यावर योग्य-अयोग्यचे शेरे मारले जात आहेत. बुधवारी (ता. २८) सुमारे ३०० ते ३२५ फायलींवर सह्या करून त्या ऑनलाइन अपलोड करण्याचे काम सुरू होते. राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यतेच्या फायलींची तपासणी वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन विद्यालयात मंगळवारी (ता. २८) माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तपासणीच्या कामात व्यस्त होते. एसआयटीच्या आदेशानुसार, फायलींतील कागदपत्रांची पूर्तता तपासून योग्य-अयोग्यचे शेरे मारणे आणि त्यानंतर फाईली पाठविण्याच्या सूचना आहेत. तीनशेवर फाईलींची तपासणी शिक्षण विभागाकडून वैयक्ति मान्यता असलेल्या फाईलींची तपासणी सुरू आहे. बुधवारी दिवसभरात तीनशेहून अधिक फाईली तपासून शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी त्यांवर सह्या केल्या. त्यानंतर संबंधित फाईली ऑनलाइन अपलोड करण्यात आल्या. चौकट आणखी ९८ मान्‍यता रद्दचे आदेश माध्‍यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेशपत्र संस्‍थाचालक व संबंधित शिक्षकांना देण्यास सुरुवात झाली आहे. वैयक्तिक मान्‍यता रद्द करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यात बुधवारी ९८ आदेश प्राप्त झाले असून, उपशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ते तालुका स्‍तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्‍याकडे पाठविण्यात आले. यानंतर हे आदेश संबंधित संस्‍थांकडे देण्यात येतील.
Read Entire Article