शिक्षकांना एक तारखेला निवृत्तीवेतन द्या

4 days ago 3
ARTICLE AD
फोटो : 33628 नाशिक ः शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना प्रकाश थेटे, धनराज वाणी, विजयकुमार हळदे, पुंडलिक पाटील. ------------------- शिक्षकांनाएक तारखेला निवृत्तीवेतन मिळावे नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचा-यांना एक तारखेला सेवानिवृत्त वेतन अदा करण्यात येत आहे. याच धर्तीवर निवृत शिक्षकांना एक तारखेला ट्रेझरीमार्फतच निवृत्तीवेतन अदा देण्यात यावे अशी मागणी नाशिक जिल्हा पेन्शनर्स संघटनेने राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. मंत्री भुसे जिल्हा परिषदेत आले असता संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप वारे, प्रकाश थेटे, राजेश आहेर, धनराज वाणी, विजयकुमार हळदे, पुंडलिक पाटील, बाळासाहेब खैरनार, रामदास सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी तसेच तांत्रिक कर्मचारी यांचे दरमहा निवृत्ती वेतन उशिराने म्हणजेच १०-१२ तारखेला होते. संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर या कर्मचा-यांचे ऑक्टोबरपासून बहुतांश जिल्हा परिषदेमध्ये सेवानिवृत्ती वेतन महानेटमार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे १ तारखेलाच अदा झाले. याच पध्दतीने महानेटमार्फत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे देखील सेवानिवृत्ती वेतन १ तारखेलाच होण्यासाठी उचित कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली. ---------------
Read Entire Article