सप्तशृंगीदेवी यात्रेत ‘एसटी’ची बल्लेबल्ले; नाशिक विभागाला चार कोटी ९४ लाखांचे उत्पन्न

2 days ago 2
ARTICLE AD
VNI26B13388 सप्तशृंगगड ः कोजागिरी पौर्णिमेस गडावरील तात्पुरत्या बसस्थानकावरील भाविक प्रवाशांची गर्दी. ------------ ३६-४ आदिमाया सप्तशृंगीदेवी ‘एसटी’वर यंदाही प्रसन्न ------------ नवरात्र, कोजागिरीमुळे नाशिक विभागाला चार कोटी ९४ लाखांचे उत्पन्न --------------- दिगंबर पाटोळे ः ​सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२८ ः श्री सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे एसटीच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी ९४ लाख ५८ हजार ७०४ रुपयांची कमाई झाली आहे. या दोन्ही यात्रांच्या काळात तब्बल ७ लाख २४ हजार १५३ भाविकांनी एसटीच्या सुलभ व सुरक्षित सेवेचा लाभ घेतला. ------------ विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्राप्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी व सर्व आगार प्रमुखांनी नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवाचे नियोजन करीत ९ ते २० ऑक्टोबर २०२६ या नवरात्रोत्सव काळात नाशिक ते सप्तशृंगगड, नांदुरी ते सप्तशृंगी गड तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध ११ आगारातून जादा बस सोडण्यात आल्या. नवरात्रोत्सवाच्या दोन दिवस अगोदर ९ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान घाटरस्ता खासगी वाहनांसाठी बंद केला होता. या १२ दिवसांच्या कालावधीत १९ हजार ६१९ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ५४ हजार ०८७ किलोमीटर वाहतूक करण्यात आली. या प्रवासातून एसटी महामंडळाला ३ कोटी ८९ लाख ९८ हजार २५ रुपये उत्पन्न मिळाले. या १२ दिवसांत ७ लाख २४ हजार १५३ इतक्या प्रवाशी भाविकांची महामंडळाने वाहतूक केली आहे. --------- कोजागिरीही जादा गाड्या ​नवरात्रोत्सवानंतर २४ व २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान साजरी झालेल्या कोजागिरी पौर्णिमा यात्रेसाठीही एसटी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. या दोन दिवसांत ५ हजार २९३ बस फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ५८ हजार ४१३ किलोमीटर बस चालवण्यात आल्या. यातून महामंडळाला १ कोटी ०४ लाख ६० हजार ६७९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. नांदुरी पायथा ते सप्तशृंगगड मार्गावर दर दहा मिनिटांनी आणि अर्ध्या तासाने बस सोडण्यात येत होत्या. ----------- ​कोट: नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमेदरम्यान लाखो भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि वेळेत सेवा देण्यासाठी नाशिक विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी अहोरात्र कार्यरत होते. भाविकांच्या उत्तम प्रतिसादामुळेच एसटीला हे घवघवीत यश मिळाले आहे. - भगवान जगनोर, विभागीय नियंत्रक, रा. प. नाशिक विभाग --------------
Read Entire Article