सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत, नागपूर आणि नाशिकमधील विद्यार्थी आंदोलनावर ठाम

2 months ago 10
ARTICLE AD

Tribal Student Protest Nagpur Nashik News : पुण्यातील मांजरीमध्ये सुरु असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण मागं घेण्यात आलं आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला नागपूर आणि नाशिकमध्ये सुरु असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचंआंदोलन अद्याप मागे घेतलेलं नाही. ते विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने सर्वच मागण्या मान्य केल्या नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

ठिय्या आंदोलनावर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार

नागपूरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी मुंबईत चर्चेसाठी गेलेले त्यांचे प्रतिनिधी नागपुरात परत आल्यानंतर सर्व आंदोलक विद्यार्थ्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर आंदोलन मागे घ्यायचा की नाही याचा निर्णय करु अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी नागपुरातील आंदोलक किमान उद्यापर्यंत आंदोलनावर ठाम आहेत. उद्या सकाळपर्यंत त्यांचे मुंबईला गेलेले प्रतिनिधी नागपुरात परतल्यानंतर ठिय्या आंदोलनावर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत त्यांची चर्चा होईल. त्यानंतरच आंदोलन परत घेण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती नागपुरात आंदोलनावर बसलेल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात ज्या विद्यार्थ्यांनी आज आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी आश्रम शाळांचा आणि खास करून जपतलाई येथील आश्रम शाळेत सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलींच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा मुद्दा तेवढ्या ताकतीने उचलून धरला नाही अशी भूमिका ही नागपुरातील विद्यार्थ्यांनी एबीपी माझा शी फोनवर संवाद करताना सांगितली आहे.

नाशिकचे आदिवासी विद्यार्थी आंदोलक आंदोलनावर ठाम

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढल्याचा दावा सरकारकडून दावा केला जात असला तरीही नाशिकमधील आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. सरकारने सर्वच मागण्या मान्य केल्या नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. सेंटर किचन योजना बंद करण्याची मागणी पूर्ण नाही. गडचिरोली आश्रम शाळेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे, आशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार आहे.

पुण्यातील मांजरीमध्ये सुरु असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण मागं घेण्यात आलं आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. आज दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत आदिवासी विद्यार्थ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या. यानंतर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी मांजरी येथे विद्यार्थ्यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहन केलं होतं. अखेर, आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचं म्हटलं आहे.

Read Entire Article