सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालीम

4 days ago 3
ARTICLE AD
पान ३ ---------------- ध्वजारोहण सोहळ्याची आज रंगीत तालीम प्राधिकरण आयुक्ता शेखरसिंहांचे ३२ विभागांना निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२६ ः सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा येत्या ३१ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर गोदावरी महाआरती आणि इतर शासकीय कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी (ता.२७) संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सर्व संबंधित ३२ विभागांना लेखी सूचना दिल्या आहेत. मुख्य सोहळ्याच्या दिवशी सर्व कार्यक्रम वेळेत पार पडावेत, सुरक्षा, वाहतूक, मान्यवरांचे आगमन-निर्गमन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयात कोणतीही अडचण राहू नये, यासाठी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींनी नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेपूर्वी हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या दरम्यान मनुष्यबळ, वाहने, साधनसामग्री आणि प्रवेश-निर्गमन मार्गांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार असून त्रुटी आढळल्यास जागेवरच दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ---------------------- रंगीत तालमीचे वेळापत्रक असे - सकाळी नऊ ः नाशिक विमानतळ- मान्यवरांचे आगमन, स्वागत, सुरक्षा आणि वाहन व्यवस्थेची पाहणी. - सकाळी दहा ः एमपीए गेस्ट हाउस मान्यवरांचे आगमन, निवास आणि प्रोटोकॉल व्यवस्थेचा आढावा. - सकाळी अकरा ः ध्वजारोहण सोहळ्याची मुख्य तालीम, सुरक्षा, धार्मिक विधी, शंखनाद, आसन व्यवस्था तपासणी. - दुपारी साडेबारा ः एमपीए गेस्ट हाउस परतीच्या हालचाली आणि विश्रांती व्यवस्थेची पाहणी. - दुपारी दोन ः त्र्यंबकेश्वर- ध्वजारोहणाशी संबंधित धार्मिक विधी, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तपासणी. - दुपारी अडीच ः त्र्यंबकेश्वर मंदिर- दर्शन, धार्मिक विधी आणि सुरक्षेच्या नियोजनाची पाहणी. - सायंकाळी साडेपाच ः सार्वजनिक कार्यक्रम स्थळ व गोदावरी आरती स्थळ- अंतिम तालीम. -------------------------------
Read Entire Article