सिंहस्थाचे दरवाजे खुले

12 hours ago 3
ARTICLE AD
पान ३ साठी -------------- परदेशी पाहुण्यांसाठी सिंहस्थ दरवाजे खुले मिलिंद हरदास समन्वयक म्हणून नियुक्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३० ः सिंहस्थ कुंभमेळा केवळ देशाचाच नव्हे, तर जागतिक वारसा म्हणून जगासमोर मांडण्यासाठी राज्य शासनाने राजशिष्टाचार पातळीवर तयारी सुरू केली आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या परदेशी मान्यवर, राजदूत आणि अनिवासी भारतीयांच्या स्वागत व समन्वयाची जबाबदारी विशेष राजशिष्टाचार अधिकारी मिलिंद हरदास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याच्या राजशिष्टाचार, परकीय भेट, गुप्तवार्ता व परदेशस्थ नागरिक विषय विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. हरदास यांची कुंभमेळ्यासाठी विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे जागतिक दर्शन घडवणारा सोहळा आहे. त्यामुळे या काळात येणाऱ्या विदेशी मान्यवरांच्या भेटींचे काटेकोर नियोजन आणि प्रभावी संपर्क यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे. --------------------- १६-१ काय असणार जबाबदारी? नियुक्तीनुसार हरदास यांना थेट परराष्ट्र दूतावास, उच्चायुक्तालये आणि विदेशी राजकीय प्रतिनिधी कार्यालयांशी समन्वय साधावा लागणार आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा यांच्यासोबत ताळमेळ, विदेशी राजदूत, उच्चायुक्त, राजकीय प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्रालयाने निर्देशित केलेल्या पाहुण्यांच्या आगमन- प्रस्थान, निवास, वाहतूक, सुरक्षा व कार्यक्रमाचे राजशिष्टाचार नियोजन, परदेशी पाहुण्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक स्थळ भेटींचे व्यवस्थापन, राजशिष्टाचार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि वेळोवेळी प्रगती अहवाल सादर करणे. ही नियुक्ती सिंहस्थाच्या पूर्वतयारी कालावधीसाठी करण्यात आली आहे. ----------------------
Read Entire Article