सेवांसाठी एक खिडकी, परीक्षा पद्धतीत ब्‍लॉकचेन तंत्रज्ञान

2 days ago 3
ARTICLE AD
परीक्षा पद्धतीत ब्‍लॉकचेन तंत्रज्ञान, सेवांसाठी एक खिडकी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २०२७-२०३२ साठी बृहत आराखडा जाहिर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ ः महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठात शैक्षणिक व प्रशासकीय सेवांसाठी ’एक खिडकी प्रणाली’ तसेच डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करणे, ’मेंटॉर-मेंटी’ कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व समावेशक अध्ययनास प्राधान्य देणे आणि नैतिक आचरणासह जबाबदार डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहनावर भर विद्यापीठाच्‍या २०२७ ते २०३२ च्‍या बृहत आराखड्यात देण्यात आला आहे. ---------- कुलगुरु डॉ. व्यंकट गिते म्‍हणाले, की बृहत आराखडयात राज्यातील आरोग्य सेवांची उपलब्धता व गरजेनुसार आरोग्य शिक्षणसंस्थांचा नियोजनबद्ध विस्तार करणे गरजेचे आहे. नवीन पदवी महाविद्यालयांना मान्यता प्रदान करण्याइतकेच नसून त्याची व्यापकता वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यमान संस्थांमधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम किंवा प्रवेशक्षमता वाढीसाठी स्वतंत्र नियोजन तरतुदी केल्‍या आहेत. नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव संबंधित आयोग, शासन आणि विद्यापीठाने निर्देशित केलेल्या नियमांनुसार कार्यवाही केली जाईल. विद्यापीठाने डिजिटल प्रणालीचा वापर नवीन महाविद्यालयांचे संलग्निकरण प्रक्रिया सुरळीत केली आहे. विद्यापीठातर्फे संशोधन, डिजिटल आरोग्य, परीक्षा सुरक्षितता, विद्यार्थी कल्याण आणि शैक्षणिक प्रगती आदी उपक्रमांना चालना दिली आहे. विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठाच्या नियोजन विभागाच्या प्रमुख योगिता पाटील, सदस्य सचिव संदीप राठोड यांनी परिश्रम घेतले. ------- १६-१ शनिवारपर्यंत अर्जांची मुदत कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्‍हणाले, विविध शैक्षणिक संस्थांना नवीन पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित संस्थाचालकांनी शनिवार (ता.३१) पर्यंत ऑनलाईन अर्ज आवश्यक शुल्कासह अर्ज भरावा. अर्जाच्या दोन छापील प्रती विद्यापीठात जमा करण्याची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत आहे. विद्याशाखानिहाय फॅकल्टीचे विविध निकष आहेत. त्यानुसार एकाच विद्याशाखेच्या महाविद्यालयांसाठी जास्त अर्ज आले तरी जितके महाविद्यालयाचे रिक्त आहेत, त्यानुसार शिफारस केली जाणार आहे. नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयांचे पुनर्मूल्यांकन करणे प्रस्तावित आहे. ------- इन्‍फोः बृहत आराखड्यासंदर्भात ठळक नोंदी.. - गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण, कुशल मनुष्यबळाचा विकास, नैतिक व नावीन्यपूर्ण संशोधन. राज्याच्या सर्व भागात आरोग्यसेवांची समतोल उपलब्धतेवर आराखडयात भर. - विद्यापीठाची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आराखड्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणार. - शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्य शिक्षणाची महाविद्यालये आवश्यक आहे. त्यानुसार योग्य मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब. - विद्यापीठात संशोधन, आंतरविद्याशाखीय कार्य व जागतिक शैक्षणिक सहकार्याला गती देण्यासह अध्यापन रुग्णालये, क्लिनिकल ट्रेनिंग, सिम्युलेशन सुविधा आणि कौशल्याधारित शिक्षणसवर भर. - आरोग्य शिक्षणाचा पाया बळकट करणे, संशोधनातील उत्कृष्टता वाढविणे आणि सक्षम व संवेदनशील आरोग्य मनुष्यबळ विकसित करण्यास प्राधान्‍य. - गुणवत्ता सुधारणा, नवोन्मेष, कौशल्य विकास, नैतिक वैद्यकीय आचरण आणि संतुलित प्रादेशिक वाढीला प्रोत्‍साहन. --------------
Read Entire Article