२२ लाखांची तंबाखू जप्त

10 hours ago 3
ARTICLE AD
शिरपूरला २२ लाखांची तंबाखू जप्त --- आयशर वाहनासह हरियाणामधील चालक अटकेत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३० ः राज्य शासनाने बंदी घातलेली १२ लाख रुपयांची हंस छाप प्रतिबंधित तंबाखू आणि दहा लाखांचे वाहन, असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी सीमा तपासणी नाक्यावर जप्त केला. या प्रकरणी हरियाणामधील एका वाहनचालकाला अटक केली असून, अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी २६ ऑक्टोबरला दुपारी साडेसहाच्या सुमारास हाडाखेड (ता. शिरपूर) सीमा तपासणी नाका येथे ही कारवाई केली. आयशर कंपनीच्या वाहनातून ( एचआर ५५ एस ३४५७) राज्यात बंदी असलेल्या प्रतिंबधित अन्नपदार्थाची (हंस छाप तंबाखू) वाहतूक केली जात होती. पोलिसांनी प्रत्येकी १२१ रुपये किमतीची हंस छाप तंबाखूची दहा हजार पाकिटे, आयशर कंपनीचे वाहन जप्त केले. या प्रकरणी इरफान पिता समसुद्दीन (वय ४१, पोटाया, रुप्रका, तह. हातीन, थाना उटावड, जि. पलवल, राज्य हरियाणा) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या १३ जुलै २०२६ च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात या अन्नपदार्थाच्या उत्पादनावर, साठ्यावर आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी आहे. असे असतानाही संशयिताने नियमांचे उल्लंघन करून याची वाहतूक केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार तपास करीत आहेत.
Read Entire Article